बचतगटाच्‍या वस्‍तूंचे घाटकोपरमध्ये प्रदर्शनृ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचतगटाच्‍या वस्‍तूंचे घाटकोपरमध्ये प्रदर्शनृ
बचतगटाच्‍या वस्‍तूंचे घाटकोपरमध्ये प्रदर्शनृ

बचतगटाच्‍या वस्‍तूंचे घाटकोपरमध्ये प्रदर्शनृ

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेच्‍या एन विभागातर्फे महिला व बालकल्याण योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटांमार्फत उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले होते. शुक्रवारी (ता. २१) सकाळी या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन व विक्री भरवण्यात आले आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दिवाळीत महापालिके मार्फत याचे आयोजन केले जाते. घाटकोपर पूर्व येथील स्टेशनजवळ हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.