Palghar: उपसरपंच पदाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election of Sarpanch and Mayor directly from  people chiplun
उपसरपंच पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

Palghar: उपसरपंच पदाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर

sakal_logo
By

पालघर: पालघर तालुक्यातील सरपंच व सदस्य पदाच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या. आता उपसरपंच पदाच्या निवडणुका २५, २७ व २८ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. सरपंच पदाच्या निवडणुका थेट झाल्या असल्या तरी उपसरपंच पदाची निवडणूक निवडून आलेल्या सदस्यांमधून बहुमताने होणार आहे. तालुक्यातील दांडी, शिगाव-खुताड, दापोली, दातिवरे, नेवाळे-राणीशी गाव, टेन-टाक वाहाळ, वाढीव सरावली, नांदगाव तर्फ तारापूर, महागाव, घीवली या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या निवडणुका २५ ऑक्टोबर रोजी होणार आहेत.

२७ ऑक्टोबर रोजी सफाळे, बऱ्हाणपूर, कुंभवली, सातीवली, मान, नवापूर, नंडोर, देवखोप, शेलवाली, उंबरोळी, अक्करपट्टी, नवी देलवडी, भादवे-मधुकरनगर, तीगरी-अंभोरे, वेडी-मजुर्ली, एडवण, नागझरी, किराट, खारे कुरण, दहिसर तर्फ मनोर, परणाली, कमारे, आवढणी, पडघे, करवाळे, विराथन बुद्रुक, बोर शेती, तांदूळवाडी, माकुणसर, हनुमान नगर, चिंचाळे, गांजे-ढेकाळे या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.

२८ ऑक्टोबर रोजी मनोर, बोईसर, पास्टर, तारापूर, केळवा, मुरबे, कलोवडे, खैरे ग्रुप, आलेवाडी, कोळगाव, पंचाळी, दहिसर तर्फ तारापूर, वेंगणी, मथाने, दांडा खटाळी, नगावे, निहे, गोवाडे, पोचाडे, तामसई, बोर शेती, गिराळे, मोरे कुरण, कोळगाव, वाकसई, वाडा खडकोना, बिरवाडी, नवघर घाटीम, सोनावे, पारगाव, मायखोप, रावते, हालोली बोट, दुर्वेस साये, जायशेत, कोंढाण, कुडन, वसरोली खरशेत, खडकोली वसरे येथील ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.

उपसरपंचांची निवडणूक घेण्यासाठी अभ्यासी अधिकारी म्हणून नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेणे याबाबत संपूर्ण प्रक्रिया अभ्यासी अधिकारी यांनी करायची आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.