एनएनएमटीला सीएनजी डिझेल दरवाढीचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनएनएमटीला सीएनजी डिझेल दरवाढीचा फटका
एनएनएमटीला सीएनजी डिझेल दरवाढीचा फटका

एनएनएमटीला सीएनजी डिझेल दरवाढीचा फटका

sakal_logo
By

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः सीएनजी व डेझेलच्या दरवाढीचा फटका नवी मुंबई परिवहन सेवेला बसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एनएमएमटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, पण परिवहन सेवेला महापालिकेचे अनुदान असल्याने सेवा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे सीएनजी व डिझेल दरवाढीनंतरही एनएमएमटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसला नाही.

नवी मुंबई परिवहन सेवेत डिझेलवर चालणाऱ्या २६२, इलेक्ट्रिक १८० व सीएनजीवरील ७० बस आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ५७ रुपये असणारा सीएनजी आता ८६ रुपयांवर पोहचले आहे; तर डिझेलचे दर ९४ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. सीएनजी व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे एनएमएमटीला महिन्याला ४० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. नवी मुंबई परिवहन सेवेच्या सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १२३ कोटी ३५ लाख चार हजार रुपयांचे महसुली उत्पन्न निर्देशित करण्यात आले आहे. परिवहन सेवेचा गाढा हाकण्यासाठी पालिकेला १८१ कोटी रुपये परिवहनला द्यावे लागणार आहेत.

डिझेल व सीएनजीच्या वाढत्या दरामुळे परिवहन सेवेने हा तोटा भरून काढण्यासाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक बस या उत्पन्नाच्या बाबतीत परवडत असल्या तरी सर्वच बस इलेक्ट्रिकवर चालवणे शक्य नाही. त्यामुळे डिझेल व सीएनजीवरच्या बस चालवाव्याच लागतात. परिवहन सेवेमध्ये भविष्यात डबल डेकर बस येणार आहेत. डबल डेकर बस ताफ्यात आल्यांनतर तोटा भरून काढण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.
-----
सीएनजी व डिझेलच्या दरवाढीमुळे एनएमएमटीला तोटा सहन करावा लागत आहे, पण परिवहन सेवेने डिझेल भरण्यासाठी असणारे कंत्राट रद्द केले आहे. भविष्यात वाशी धर्तीवर कोपरखैरणे व बेलापूर येथे बस ट्रर्मिनलचे काम करण्यात येणार आहे. बस ट्रर्मिनल पूर्ण झाल्यांनतर परिवहनला यातून उत्पन्न मिळेल.
- योगेश कडुसकर, परिवहन व्यवस्थापक