बोर्डीत समुद्रकिनारी रानडुकराची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डीत समुद्रकिनारी रानडुकराची दहशत
बोर्डीत समुद्रकिनारी रानडुकराची दहशत

बोर्डीत समुद्रकिनारी रानडुकराची दहशत

sakal_logo
By

बोर्डीत समुद्रकिनारी रानडुकराची दहशत
बोर्डी, ता. २२ (बातमीदार) ः बोर्डीच्या समुद्रकिनारी एका भल्या मोठ्या रानडुकराने दहशत माजविली आहे. देशी डुकरांनी पाठलाग करून चार जणांना जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. गत काही वर्षांपासून या भागात शेती बागायतीमध्ये रानडुकरे नुकसान करत आहेत. रानडुकरांच्या त्रासाला शेतकरी कंटाळले आहेत; मात्र यावर कोणताच उपाय नसल्यामुळे शेतकऱ्याने नाईलाजाने दुर्लक्ष करावे लागत असून नुकसान सोसावे लागत आहे. मागच्या काही दिवसांपासून एका डुकराने चक्क समुद्रकिनाऱ्यावर मुक्काम ठोकला आहे. समुद्रकिनाऱ्यावर घाण खाण्यासाठी आलेल्या देशी डुकरांवरती हे रानडुक्कर हल्ला करत आहे. या डुकराला हुसकावण्यासाठी गेलेल्या चार जणांवर डुकराने हल्ला करून जखमी केले आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते. वनविभागाने या रानडुकरांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.