ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २२ (बातमीदार) ः नोकरी तसेच काम मिळवून देतो, अशा बतावण्या करून प्रोसेसिंग फी व इतर कारणे सांगून लाखोंची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याला मानखुर्द पोलिसांनी बुधवारी (ता. १९) अटक केली. साहिल शेख ऊर्फ अब्दुल्ला असे या भामट्याचे नाव असून त्याच्याकडून सुमारे सहा लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.
वाशी कमर या मासे विक्रेत्याला दोन वर्षांपूर्वी साहिलने व्यवसायासाठी सिमकार्ड हवे असल्याचे सांगितले. त्यानुसार वाशी यांनी त्यांच्या आधारकार्डच्या आधारे सिमकार्ड घेऊन साहिलला दिले. त्यानंतर त्याने वाशी यांच्याकडे वारंवार सिमकार्डची मागणी केली. त्यानुसार वाशी यांनी स्वतःच्या तसेच पत्नीच्या नावे असे मिळून १२ सिमकार्ड त्याला दिले. वाशी यांच्या पत्नीला उत्तर प्रदेशातून फोन आला. त्यामुळे त्यांनी साहिलला दिलेल्या सिमकार्डचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी होत असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर वाशी यांनी मानखुर्द पोलिस ठाणे गाठत साहिलविरोधात तक्रार नोंदवली. तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाशी यांच्या आरोपांची मानखुर्द पोलिसांना खात्री झाली. विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवत पोलिसांनी साहिलच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो व्हॉटसॲपवरून जाहिरात करायचा, इतरांच्या नावे सिमकार्ड घेऊन त्याद्वारे संपर्क साधून नोकरी देतो, कामे मिळवून देतो अशी आश्वासने द्यायचा, त्यासाठी नोंदणी शुल्क आकारायचा व ते वसूल करण्यासाठी बोगस आधारकार्डाचा वापर करून विविध बँकांमध्ये बोगस नावाने खाते उघडायचा. अशा प्रकारे फसवणूक करून लाखो रुपये त्याने कमावल्‍याचे तपासातून पुढे आले आहे.