कल्याणमधील सुभाष मैदानाची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमधील सुभाष मैदानाची दुरवस्था
कल्याणमधील सुभाष मैदानाची दुरवस्था

कल्याणमधील सुभाष मैदानाची दुरवस्था

sakal_logo
By

कल्याण, ता. २२ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यातच कल्याणचे वैभव असलेल्या सुभाष मैदानाची दयनीय अवस्था बघून क्रीडाप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. खराब रस्ते, वाहतूक समस्या, पाण्याचे प्रश्न, अनधिकृत बांधकामे यामुळे केडीएमसीच्या कामकाजावर नेहमीच बोट ठेवले जाते.
शहरात आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले असताना आता शहरातील खेळाडूंना सराव करण्यासाठी सुसज्ज मैदान उपलब्ध नाही. सुभाष मैदानामध्ये सर्वच वयोगटांतील नागरिक खेळण्यासाठी तसेच व्यायामासाठी येत असतात. मैदानामध्ये काय सुविधा आहेत यावर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील मैदानातील पावसाळ्यानंतरचे गवत काढून सरावाला सुरुवात झाली आहे; पण सुभाष मैदानात गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खेळाडूंना सरावही करता येत नसल्याची खंत अनेक खेळाडूंनी व्यक्त केली आहे.
जागोजागी कचरा आणि मैदानाची दुरवस्था झाली आहे. सुभाष मैदानात प्रेक्षक गॅलेरी आहे; मात्र त्याची दुरवस्था झाली असून त्याचा वापर गर्दुल्ले आणि पत्ते कुटणारे जुगारी करत आहेत. ही दुरवस्था पाहून क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लवकरात लवकर मैदानामधील समस्या दूर करण्याची मागणी क्रीडा प्रेमी करू लागले आहेत.

...................................
संबंधित विभागाला मैदानाबाबत सूचना दिल्या असून लवकरच समस्या दूर केल्या जातील.
- जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, केडीएमसी पालिका