शहापूरचा दिवाळी फराळ सातासमुद्रपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूरचा दिवाळी फराळ सातासमुद्रपार
शहापूरचा दिवाळी फराळ सातासमुद्रपार

शहापूरचा दिवाळी फराळ सातासमुद्रपार

sakal_logo
By

खर्डी, ता. २२ (बातमीदार) : वर्षभर आपल्याकडे खाद्यपदार्थांची रेलचेल असली तरी दिवाळी फराळाचे महत्त्व मात्र अबाधित राहिले आहे. शिक्षण आणि नोकरीसाठी सातासमुद्रापलीकडे गेलेली मुले, भावंडे अथवा नातलगांसाठी दिवाळीतल्या घरच्या फराळासोबतच्या भावनिक नात्याचा गोडवा कायम आहे. त्यामुळेच परदेशस्थ नातलगांसाठी शहापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दिवाळीचा फराळ पाठवला जात आहे. परदेशी दिवाळी फराळ पाठवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस शहापूरमध्ये वाढत आहे.
या फराळाची पार्सल्स परदेशात स्थायिक आप्तेष्टांना पाठवण्यासाठी खासगी कुरिअरचाही आधार घेतला जात आहे. शहापूरच्या टपाल खात्यानेदेखील या सेवेसाठी तत्परता दाखवली आहे. एरव्हीच्या पार्सल्स व कुरिअरपेक्षा दिवाळी फराळासाठी मोठी पार्सल्स करावी लागत आहेत. अवघ्या १० ते १२ दिवसांत ही पार्सल्स योग्य स्थळी पोहचवण्याचे काम कुरिअर कंपन्या व टपाल खाते करीत आहे. अमेरिका, रशिया, यूके, मलेशिया, दुबई आणि कॅनडात ही पार्सल्स जात आहेत.

----------------------------------------------------------------
परदेशस्थ कुटुंबांसाठी दिवाळी फराळाची पार्सल्स येथून जात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने फराळाची पॅकिंग घरी न करता आम्ही कार्यालयात करत आहोत. लगेच खराब होणारे पदार्थ न पाठवता सुके पदार्थ पाठवले जातात. जेणेकरून इतर पदार्थ खराब होऊ नये यासाठी आम्ही ग्राहकांची काळजी घेत आहोत.
संदीप निमसे, डाकसेवा अधिकारी, शहापूर