किन्हवली सरपंचपदी सचिन कुंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किन्हवली सरपंचपदी सचिन कुंदे
किन्हवली सरपंचपदी सचिन कुंदे

किन्हवली सरपंचपदी सचिन कुंदे

sakal_logo
By

किन्हवली, ता. २२ (बातमीदार) : किन्हवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदाचे उमेदवार सचिन कुंदे निवडून आले आहेत. शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या किन्हवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सचिन कुंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करून १४२७ इतके मताधिक्य मिळवून थेट सरपंचपदाची निवडणूक जिंकली. सचिन कुंदे हे गेल्या पंचवार्षिक काळातही किन्हवली ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्यांचे वडील रमेश भागोजी कुंदे हेसुद्धा सन २००० ते २००५ या कालावधीत किन्हवली ग्रामपंचायतीचे सरपंच राहिले आहेत.
याशिवाय किन्हवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अजय चौधरी, संगीता शिद, गौरव शिंदे, रोहिणी कुंदे, धनंजय कुंदे, फिरोजा शेख, कल्पना शिंदे, दीपक सराई, अपर्णा पतंगराव, रोहिणी उबाळे, कैलास डोंगरे अशा ११ जणांचा समावेश आहे. उपसरपंच पदाची निवडणूक २७ ऑक्टोबर रोजी होणार असून निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे.