नरेश म्हस्के यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेश म्हस्के यांची निवड
नरेश म्हस्के यांची निवड

नरेश म्हस्के यांची निवड

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी निवड झाली आहे. उल्हासनगरातील माजी नगरसेवकांनी नरेश म्हस्के यांची भेट घेऊन म्हस्के यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या शिवसेनेला राज्यात बळ मिळणार, असा विश्वास व्यक्त केला.
बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयकपदावर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. उल्हासनगरातून बाळासाहेबांची शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज, अरुण आशान, विजय पाटील, कलवंतसिंग सोहता, जयकुमार केणी, विभागप्रमुख प्रमोद पांडे, उपविभागप्रमुख जितेंद्र उपाध्याय, समाजसेवक रामकृपाल यादव, करण जाधव यांनी म्हस्के यांची भेट घेतली.