सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात चार्टर्ड अकाउंटंटवर मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात चार्टर्ड अकाउंटंटवर मार्गदर्शन
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात चार्टर्ड अकाउंटंटवर मार्गदर्शन

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात चार्टर्ड अकाउंटंटवर मार्गदर्शन

sakal_logo
By

पालघर, ता. २२ (बातमीदार) : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय अकाउंटन्सी विभाग, बिजनेस इकॉनॉमिक व इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात अकाउंटन्ट भरत धोंडे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भरत धोंडे यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य विभागातील भविष्यकालीन संधी, चार्टर्ड अकाउंट बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते व कसे प्रयत्न करावे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सहसचिव जयंत दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेनुसार वाणिज्य शाखेतील उपलब्ध विविध संधींचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. प्रशांत कदम, डॉ. योगेश कुलकर्णी, प्रा. जितेंद्र तिवारी, डॉ. शहनाज रतनानी, प्रा. कविता संख्ये यांनी परिश्रम घेतले.