ऐन दिवाळीत फुलाला कवडी मोल भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन दिवाळीत फुलाला कवडी मोल भाव
ऐन दिवाळीत फुलाला कवडी मोल भाव

ऐन दिवाळीत फुलाला कवडी मोल भाव

sakal_logo
By

कल्याण, ता. २२ (बातमीदार) : परतीच्या पावसाने फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे दिवाळी हंगाम वाया जातो की काय, अशी भीती फुल उत्पादक व्यक्त करत आहेत; तर कल्याणच्या कृषी उपन्न बाजार समितीत पावसामुळे ओल्या फुलांचा माल कवडीमोल भावात विकण्याची वेळ दुकानदारांना आली आहे.
दोन वर्षांनंतर कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आल्यामुळे यंदा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे सणासुदीत फुलांनी बाजार फुलले आहेत. यामुळे गणेशोत्सव, नवरात्र आणि दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात फुलांना मागणी होती; मात्र दिवाळीपूर्वी कल्याणसह राज्यातील विविध शहरांत परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी आणि व्यापारी वर्ग चांगलाच हवादिल झाला आहे. पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे; तर कल्याणच्या कृषी उपन्न बाजार समितीच्या फूल मार्केटमध्ये पावसामुळे ओली झालेली फुले आली आहेत, पण या फुलांना कवडीमोल भाव मिळत आहे.
...
पावसाने फूलझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाजारात ओली फुले आली असून ती कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहेत.
नीतेश पारेख, घाऊक व्यापारी, कल्याण कृषी उपन्न बाजार समिती

हारांचे भाव वधारले
बाजारात मोठ्या प्रमाणात खराब फुले आल्याने हारांचे भाव वाढले आहेत. दिवाळीमध्ये हारांचे भाव असेच राहण्याची शक्यता आहे. बाजारात ७० टक्के माल खराब येत आहे. पण बीड, परभणी, हिंगोली, या भागात काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उर्वरित ३० टक्के चांगला माल बाजारात आल्याची माहिती व्यापारी वर्गाने सांगितली.

फुलांचे दर
ओली फुले
झेंडू - ३० ते ५० रुपये प्रति किलो
शेवंती - ४० ते ६० रुपये प्रति किलो
अष्टर - १०० ते १२० रुपये प्रति किलो
छडी - १०० ते १६० रुपये प्रति किलो
सोन चाफा - १५० ते २०० रुपये प्रति किलो
कापरी - ६० ते ८० रुपये प्रति किलो

सुकी फुले
झेंडू - ८० ते १२० रुपये प्रति किलो
शेवंती - ८० ते १२० रुपये प्रति किलो
अष्टर - १५० ते २०० रुपये प्रति किलो
छडी - १५० ते २०० रुपये प्रति किलो
सोन साफा - १५० ते २०० रुपये प्रति किलो
कापरी - १२० ते १५० रुपये प्रति किलो