पालघरच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी
पालघरच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी

पालघरच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By

पालघर, ता. २२ (बातमीदार) : पालघरमध्ये आठवड्याच्या शुक्रवारच्या बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली. दुकानातील ब्रॅण्डेड कपडे खरेदी करण्यापेक्षा रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा दिसून येत होता. दिवाळीसाठी लागणारे कपडे, पणत्या व इतर साहित्य खरेदीसाठी खेड्यापाड्यातील लोक बाजारात आले होते.
पावसाळा अद्यापही सुरूच असल्याने शेतीची कामे खोळंबून राहिली आहेत. भातकापणी झालेली नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसेही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीसाठी उधार पैसे घेऊन मुलाबाळांसाठी रस्त्यावरील कपडे खरेदी करत असल्याचे एका ग्राहक महिलेने सांगितले.