संस्कृती तांडेल उत्कृष्ट अभिनेत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृती तांडेल उत्कृष्ट अभिनेत्री
संस्कृती तांडेल उत्कृष्ट अभिनेत्री

संस्कृती तांडेल उत्कृष्ट अभिनेत्री

sakal_logo
By

विरार, ता. २२ (बातमीदार) : आण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. संस्कृती तांडेल या विद्यार्थिनीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. ठाकूर श्यामनारायण वरिष्ठ महाविद्यालय, माध्यम व संवाद विभाग, कांदिवलीद्वारे चित्रकला लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या चित्रपट महोत्सवात वर्तक महाविद्यालयातील चार समूहांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी उत्कृष्ठ शॉर्ट फिल्मसाठीचे द्वितीय पारितोषिक संस्कृती तांडेल हिच्या ग्रुपला मिळाले आहे. तसेच या महोत्सवातील उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिकही संस्कृती तांडेल या विद्यार्थिनीला मिळाले आहे. उत्कृष्ट पटकथा लेखनासाठीचे पारितोषिकही संस्कृती तांडेल आणि ग्रुपला मिळाले आहे. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे पारितोषिक रितिका खांबे आणि ग्रुप यांना मिळाले. उत्कृष्ट संगीतासाठीचे पारितोषिक सृष्टी बने आणि ग्रुपला यांना मिळाले आहे.
स्पर्धेमध्ये विविध सात विभागांमध्ये एकूण दहा पारितोषिके देण्यात आली. पैकी पाच पारितोषिके वसईच्या आण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, उपप्राचार्य स्वाती जोशी, पर्यवेक्षक आत्माराम गोडबोले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मनीषा गावड, प्रा. मकरंद वाकडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.