सांगळे फाऊंडेशनतर्फे विक्रोळीत दिवाळी पहाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगळे फाऊंडेशनतर्फे विक्रोळीत दिवाळी पहाट
सांगळे फाऊंडेशनतर्फे विक्रोळीत दिवाळी पहाट

सांगळे फाऊंडेशनतर्फे विक्रोळीत दिवाळी पहाट

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : माजी आमदार मंगेश सांगळे सोशल फाऊंडेशनतर्फे सोमवारी (ता. २४) विक्रोळी पूर्व येथे प्रारंभ हा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कन्नमवार नगर २ येथील विकास हायस्कूल, रवींद्र म्हात्रे मैदानासमोर हा कार्यक्रम पार पडेल. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार मनोज कोटक, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख व कार्याध्यक्ष ईशा कोपीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश राणे, विनायक जजोडिया, ओंकार वायंगणकर, विनोद घोगळे प्रयत्नशील आहेत.