बोईसरच्या सरपंच पदी दिलीप धोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरच्या सरपंच पदी दिलीप धोडी
बोईसरच्या सरपंच पदी दिलीप धोडी

बोईसरच्या सरपंच पदी दिलीप धोडी

sakal_logo
By

मनोर, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या बोईसर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडीचा घोळ संपला असून भाजप शिंदे गट आघाडीचे उमेदवार दिलीप धोडी यांना १२९ मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे. सरपंच निवड घोषित करण्याच्या अधिसूचित तारखेत बदल करून शुक्रवारी सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधील मतदान केंद्र दोन आणि सहामधील कंट्रोल युनिटमध्ये पाच मते पडल्यानंतर बिघाड झाला होता. त्यामुळे कंट्रोल युनिट बदलून नविन कंट्रोल युनिट लावण्यात आले होते. मतदान पक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी दरम्यान दोन्ही यंत्रांवरील मतांची मोजणी करताना बिघाड झालेल्या कंट्रोल युनिट मधील नोंद राखीव यंत्रात लावल्यानंतरही मतमोजणी करता आली नव्हती. नविन यंत्रामधील मतमोजणी केली असता पहिल्या क्रमांकावरील दिलीप घोडी यांना सर्वाधिक ५,८४८ मते तर दुसऱ्या क्रमांकावरील अनिल रावते यांना ५,७१९ मते मिळाली आहेत. दोन्ही उमेदवारांच्या मतांमधील फरक १२९ मतांचा आहे. त्यामुळे अनिल रावते यांना बिघाड झालेल्या कंट्रोल युनिटमधील पाच मते दिल्यानंतरही निवडणूक निकालावर परिणाम होत नसल्याने निकाल जाहीर करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.