मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाप्पाची चांदीची मूर्ती भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाप्पाची चांदीची मूर्ती भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाप्पाची चांदीची मूर्ती भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाप्पाची चांदीची मूर्ती भेट

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीची कायमस्वरूपी आठवण म्हणून बाप्पाची चांदीची मूर्ती भेट दिली आहे. आज वर्षा बंगल्यावर आमदार कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत बाप्पाची चांदीची मूर्ती भेट दिली. या वेळी आयलानी यांचे स्वीय सहायक उमेश सोनार, भाजपचे कार्यकर्ते मनोज मिरचंदानी उपस्थित होते. या वेळी लवकरात लवकर शक्यतो दिवाळीच्या नंतर धोकादायक इमारतींबाबत अध्यादेश काढण्यात येणार, एमएमआरडीएच्या काँक्रीटच्या रोडला गती देण्यात येणार आणि पालिकेच्या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली.