शासनाच्या दिवाळी किराणा किटची ३०० रुपयाला विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासनाच्या दिवाळी किराणा किटची ३०० रुपयाला विक्री
शासनाच्या दिवाळी किराणा किटची ३०० रुपयाला विक्री

शासनाच्या दिवाळी किराणा किटची ३०० रुपयाला विक्री

sakal_logo
By

खर्डी, ता. २२ (बातमीदार) : १०० रुपयांच्या दिवाळी रेशन किटची ३०० रुपयांत विक्री करणाऱ्या रेशन दुकानदारावर पुरवठा अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली होती. तालुक्यात १०८ ठिकाणी किट उपलब्ध असून ६३ ठिकाणी अजूनही किट उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधव संताप व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी फुगाळे येथील आदिवासी वस्तीवर शासनाने १०० रुपयाच्या किराणा किटची ३०० रुपयांना रेशन दुकानदार एकनाथ भला व चंद्रिका वाघ हे विकत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रारी अर्जाद्वारे केली होती. याप्रकरणी पुरवठा अधिकारी चौधरी यांनी चौकशी करून रेशन दुकानदार एकनाथ भला व इतर एकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकीय वादामुळे झाली असल्याची चर्चा विभागात सुरू असून याबाबत पोलिस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.