चर्नी रोड स्थानकावर तिकीट आरक्षण कार्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चर्नी रोड स्थानकावर तिकीट आरक्षण कार्यालय
चर्नी रोड स्थानकावर तिकीट आरक्षण कार्यालय

चर्नी रोड स्थानकावर तिकीट आरक्षण कार्यालय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकाच्या दक्षिण पूर्व टोकाला एक नवीन रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. २२) शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्नी रोड स्थानकांवर एक अतिरिक्त रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालय सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने तिकीट आरक्षण कार्यालय बांधण्यात आले. शनिवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या तिकीट आरक्षण कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात रेल्वे अधिकारी आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. तिकीट आरक्षण कार्यालय चर्नी रोड स्थानकाच्या दक्षिण पूर्व टोकाला असून प्रवाशांच्या सोयीसाठी ते सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या नव्या तिकीट आरक्षण कार्यालयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.