शंभर रुपयाचे किट नोव्हेंबरमध्ये मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभर रुपयाचे किट नोव्हेंबरमध्ये मिळणार
शंभर रुपयाचे किट नोव्हेंबरमध्ये मिळणार

शंभर रुपयाचे किट नोव्हेंबरमध्ये मिळणार

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. २३ (बातमीदार) ः शंभर रुपयांत दिवाळी किराणा साहित्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे. आता दिवाळी सुरू झाली आहे. मात्र, शंभर रुपयाचे हे किराणा साहित्य किट नोव्हेंबरमध्ये शिधापत्रिकाधारकांना मिळेल, अशी माहिती दुकानदार देत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. फक्त घोषणा करून सरकारने आमची थट्टा करू नये, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे ऑनलाईन बायोमेट्रिक थम्ब मशीन काही दिवसापांसून सर्व्हर बंद असल्यामुळे बंद होते. त्या वेळी ग्राहकांना शिधा मिळत नव्हता. दुकानदारांचे कमिशन मिळत नव्हते. त्या वेळी ग्राहकांनी तीव्र आंदोलन केले होते. कोपरखैरणे विभागातील सेक्टर एक ते चार येथील नागरिकांना वाटप करण्यात येणाऱ्या शिधापत्रिकेवरील धान्याचा घोळ सुरू होता. अनेक दुकानदार काळाबाजार करून ते विकत होते. मनसेने याप्रकरणी आंदोलन केले होते. आता शंभर रुपयाच्या किराणा साहित्यासाठी पुन्हा आंदोलन करावे की काय, असा सवाल मनसेने केला आहे.