ऊर्जा विभागातील दिव्यांग उपोषणाच्‍या तयारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊर्जा विभागातील दिव्यांग उपोषणाच्‍या तयारीत
ऊर्जा विभागातील दिव्यांग उपोषणाच्‍या तयारीत

ऊर्जा विभागातील दिव्यांग उपोषणाच्‍या तयारीत

sakal_logo
By

धारावी, ता. २३ (बातमीदार) : महावितरण, महापारेषण, महाजेनकोमध्ये मागील दोन वर्षांपासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण असूनसुद्धा दिव्यांग कर्मचाऱ्यांना डावलण्यात येत असल्‍याचा आरोप प्रहार दिव्यांग शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनेने केला आहे. मागील दोन वर्षांपासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना बिंदुनामावलीनुसार पद्दोन्नती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महावितरण, महापारेषण, महाजेनकोमधील दिव्‍यांग कर्मचारी नाराज झाले आहेत.
प्रहार संघटनेने सांगितले आहे की, महावितरण, महापारेषण, महाजेनकोमध्ये मागील अनेक वर्षांपासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याकरीता प्रशासनामार्फत नाहक त्रास दिला जातो. तसेच शासन निर्णयाप्रमाणे अद्याप दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे पुरविण्यात आलेली नाहीत. ‘प्रहार’ने या संदर्भात शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे; परंतु अद्याप दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत प्रशासनाला सहानुभूती नाही. त्यामुळे प्रहार संघटना १ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.