अंगणवाडी कर्मचारी मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी कर्मचारी मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
अंगणवाडी कर्मचारी मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

अंगणवाडी कर्मचारी मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

sakal_logo
By

कासा, ता. २३ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्यात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी असून त्यापैकी बहुसंख्य गरीब घरातील आहेत, पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, महागाई भत्ता मिळत नाही. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर कृती समितीच्या नेत्यांशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे मानधन वाढीबाबत सरकार दिवाळीपूर्वी घोषणा करील, असा विश्वास या कर्मचाऱ्यांना होता, पण याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे बुधवारी भाऊबीजेच्या दिवशी हजारो अंगणवाडी भगिनी मुख्यमंत्री असलेल्या आपल्या भाऊरायाला ओवाळण्यासाठी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाणार असून त्या मानधनवाढीची ओवाळणी मागणार असल्याचे अंगणवाडी संघटनेकडून सांगण्यात आले.