दुर्बल घटकांच्या मागण्यांकडे लक्ष द्या ः साडविलकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्बल घटकांच्या मागण्यांकडे लक्ष द्या ः साडविलकर
दुर्बल घटकांच्या मागण्यांकडे लक्ष द्या ः साडविलकर

दुर्बल घटकांच्या मागण्यांकडे लक्ष द्या ः साडविलकर

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. २३ (बातमीदार) ः धर्मादाय ट्रस्टच्या रुग्णालयात एकूण उपलब्ध खाटांची संख्या आणि आतापर्यंत दुर्बल घटकांसाठी किती खाटा उपलब्ध झाल्या, याची संख्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वर्षभरापासून केली जात आहे; पण मागील सरकारने याकडे दुर्लक्ष केले. या सरकारने तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णमित्र संस्थेचे संस्थापक विनोद साडविलकर यांनी केली आहे.

दुर्बल घटकातील रुग्ण जर आजारी पडला, तर त्याला कोणती सरकारी योजना लागू पडते, कोणते लाभ आहेत, याची माहिती रुग्णांना मिळत नाही. त्यामुळे दुर्बल घटकातील रुग्णाला नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागतात. खासगी रुग्णालयात उपचार घेताना तो कर्जबाजारी होतो. पैसे नसल्याने रुग्ण अनेकदा सरकारी रुग्णालयात उपचार घेतो. सरकारी नियमानुसार निर्धन रुग्णांसाठी उत्पन्न मर्यादा वार्षिक ८५ हजार रुपये असून १० टक्के राखीव खाटा त्यांच्यासाठी ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, त्यांना पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचार आहेत. मात्र, ही माहिती त्यांना मिळत नाही. काही ट्रस्टची रुग्णालये सरकारी नियम पायदळी तुडवत आहेत, असा आरोप साडविलकर यांनी केला आहे.