नाले बंदिस्त नसल्याने रोगराईत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाले बंदिस्त नसल्याने रोगराईत वाढ
नाले बंदिस्त नसल्याने रोगराईत वाढ

नाले बंदिस्त नसल्याने रोगराईत वाढ

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. २३ (बातमीदार) ः दुर्गंधीयुक्त नाले बंदिस्त करावेत, अशी मागणी माजी नगरसेविका ॲड. भारती पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती; पण यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. या नाल्यांमुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे आता तरी नाले बंदिस्त करावेत, अशी मागणी पाटील यांनी पुन्हा केली आहे. कोपरखैरणे, सेक्टर १४ येथील त्रासदायक असलेला नाला बंदिस्त करणे व या बंदिस्त नाल्याच्या जागी पार्किंग (वाहनतळ) उभारणे किंवा इतर सुविधा देणे याबाबतचे निवेदन भरती पाटील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले होते. या नाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करत ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी पाटील यांनी पुन्हा केली आहे.