स्टॉलवरील कारवाईमुळे दिव्यांग त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टॉलवरील कारवाईमुळे दिव्यांग त्रस्त
स्टॉलवरील कारवाईमुळे दिव्यांग त्रस्त

स्टॉलवरील कारवाईमुळे दिव्यांग त्रस्त

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. २३ (बातमीदार) ः दिव्यांग व्यक्ती उदरनिर्वाहासाठी सरकारच्या नियमानुसार अटी-शर्ती पाळून स्टॉल लाऊन व्यवसाय करत असेल तर त्याच्यावर पालिका व संबंधित विभाग कारवाई करू शकत नाही. कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी सरकारने धोरण आखले आहे. तरीही दिव्यांग व्यक्ती स्टॉलधारकांना आंदोलन करावे लागत आहे, ही घटना न्यायालयाचा अपमान करणारी आहे, असे मत दिव्यांग सेना ऑफ नवी मुंबई व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

प्रशासनाने सर्व कागदपत्रे व पुरावे पाहता त्यांना स्टॉल देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. सन २०१२ व २०१६ मध्ये न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही २०० स्केअर फुटांची जागा अर्जदार दिव्यांग व्यक्तीला मिळत नाही. त्यामुळे दिव्यांग सेना ऑफ नवी मुंबई व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने १० ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी त्यांना प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही ते आश्वासन पूर्ण केले जात नाही, अशी तक्रार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. प्रत्येक वेळी आंदोलन केले की आम्हाला आश्वासन दिले जाते. मात्र स्टॉल कधी देणार, असा सवाल दिव्यांग आंदोलनकर्ते करत आहेत.