कल्याण डोंबिवलीत टीबीमुक्त अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण डोंबिवलीत टीबीमुक्त अभियान
कल्याण डोंबिवलीत टीबीमुक्त अभियान

कल्याण डोंबिवलीत टीबीमुक्त अभियान

sakal_logo
By

कल्याण, ता. २३ (बातमीदार) : कल्याण, डोंबिवली परिसरात टीबीमुक्त भारत या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांनी केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत निदान झालेल्या क्षयरुग्णांना उपचार आहारासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार पालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनपातील डॉ. श्रेयस गोडबोले व डॉ. विक्रम जैन आणि इनर व्हील क्लब ऑफ कल्याण व किशोर मुळसे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी निक्षय मित्र होऊन मनपातील ३१ रुग्णांना दत्तक घेत त्यांना पोषक आहाराचे वितरण केले आहे. हा कार्यक्रम पालिका रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आयोजित करण्यात आला होता. रुग्णांना पोषक आहाराचे वाटप हे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टीके, डॉ. श्रेयस गोडबोले, विक्रम जैन व इनर व्हील ऑफ कल्याणच्या अध्यक्षा नीता, मुळसे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी प्रीती मून आणि क्षयरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.