आनंदाचा शिधा किटचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाचा शिधा किटचे वाटप
आनंदाचा शिधा किटचे वाटप

आनंदाचा शिधा किटचे वाटप

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : राज्य सरकारच्या पुढाकाराने रेशन दुकानातून अवघ्या शंभर रुपयांत आनंदाचा शिधा किट जाहीर करण्यात आले आहे. यात शहरातील १७ रेशन दुकानांत या किटचे वितरण करण्यात आले. पश्चिमेतील प्रभाग क्रमांक १ आणि ३ मधील शहाड, हनुमान नगर, धोबीघाट, फाटक येथील रेशन दुकानांतून लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा कीट वाटपाची सुरुवात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे विक्की भुल्लर, माजी नगरसेवक जयकुमार केणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख विनोद साळेकर, प्रमोद पांडे, उपविभाग प्रमुख राजू साळवी, सुभाष कुंभार, सनी चैनानी, सोहनसिंग (सनी) लबाना आदी उपस्थित होते. तसेच उल्हासनगर पूर्वेतील रेशन दुकानात माजी नगरसेवक अरुण आशान, रमेश चव्हाण, जयकुमार केणी, युवासेना शहरप्रमुख सुशील पवार आदींच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.