दिवाळी उत्सवावर पावसाचे विरजण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी उत्सवावर पावसाचे विरजण
दिवाळी उत्सवावर पावसाचे विरजण

दिवाळी उत्सवावर पावसाचे विरजण

sakal_logo
By

किन्हवली, ता. २३ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे दाणे भरलेले उभे भातपीक आडवे झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे दिवाळी साजरी करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नसल्याने सणावर विरजण पडले आहे. अशात रविवारची सुट्टी असूनही फटाके व रोषणाई साहित्याच्या दुकानांत शुकशुकाट असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या कित्येक दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्याने शेतात दाणे भरून डोलणारे उभे भातपीक आडवे होण्याची भीती आहे. शेतातील तयार भातपीक कापून खळ्यात आले नसल्याने दिवाळी साजरी करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता दिसून येत नाही. किन्हवली येथे आज आठवडी बाजार असूनही फटाके व रोषणाई साहित्य विक्रीच्या दुकानात ग्राहकांचा शुकशुकाट होता.