टाटा टेक्नो फॅब मोटर्सतर्फे वाहन ग्राहक सुरक्षा दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा टेक्नो फॅब मोटर्सतर्फे वाहन ग्राहक सुरक्षा दिवस
टाटा टेक्नो फॅब मोटर्सतर्फे वाहन ग्राहक सुरक्षा दिवस

टाटा टेक्नो फॅब मोटर्सतर्फे वाहन ग्राहक सुरक्षा दिवस

sakal_logo
By

खर्डी, ता. २३ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय वाहन ग्राहक सुरक्षा दिवसानिमित्त मुंबई -नासिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील लाहे येथील टाटा टेक्नो फॅब मोटर्सतर्फे वाहनाची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शहापूर तालुक्यातील विकसक गणेश राऊत यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील टाटाच्या वाहनांची दुरुस्ती व सर्व्हिसिंग करताना वाहनांची काळजी कशी घ्यावी, वाहने चालवताना सीट बेल्ट लावल्याने अपघात झाल्यास प्रवाशांचा जीव वाचतो, याबाबत जनजागृती करण्यात आली. या वेळी स्थानिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. येथील वर्कशॉपमध्ये खरेदी, दुरुस्ती व सर्व्हिसिंग सुरू करण्यात आली असल्याचे टेक्नो फॅब मोटर्स वर्कशॉपचे मालक नितीन निर्मलकर यांनी या वेळी जाहीर केले. या कार्यक्रमाला नितीन निर्मलकर यांच्‍यासह निकसोन निर्मलकर, व्यवस्थापक अनंत गायकर, प्रमोद जाधव, संतोष भोईर आदी मान्यवरांसहित परिसरातील वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.