मसाज पार्लरवर पोलिसांची धाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसाज पार्लरवर पोलिसांची धाड
मसाज पार्लरवर पोलिसांची धाड

मसाज पार्लरवर पोलिसांची धाड

sakal_logo
By

भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : अश्लील कृत्य सुरू असलेल्या मिरा रोड येथील स्पा मसाज पार्लरवर धाड टाकून पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन बेंद्रे यांना मिरा रोडच्या कनाकिया भागात असलेल्या अंक सलोन व स्पामध्ये मसाजच्या नावाखाली अश्लील कृत्ये सुरू असल्याची माहिती मिळाली होती. बोगस गिऱ्‍हाईकाच्या माध्यमातून त्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी पार्लरवर धाड टाकली. यावेळी एका ३४ वर्षीय महिलेसह पार्लर चालविणाऱ्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले.