कष्टकरी महिलांना साडी वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कष्टकरी महिलांना साडी वाटप
कष्टकरी महिलांना साडी वाटप

कष्टकरी महिलांना साडी वाटप

sakal_logo
By

ठाणे, ता. २३ ः दिवाळीनिमित्त रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलने ‘माहेरची साडी’ हा एक आगळावेगळा उपक्रम राबवला. या अनोख्या उपक्रमांतर्गत क्लबने ट्रान्सजेंडर्स, भाजी विक्रेत्या आणि सफाई कर्मचारी महिला अशा सुमारे २०० जणींना साड्यांचे वाटप केले. या उपक्रमाची संकल्पना आणि जबाबदारी क्लबच्या माजी अध्यक्षा नेहा निंबाळकर यांची होती. यात त्यांना विद्यमान अध्यक्षा माधवी डोळे आणि सर्व सभासदांनी मोलाची साथ दिली.