ठाण्यात रोषणाईचा झगमगाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात रोषणाईचा झगमगाट
ठाण्यात रोषणाईचा झगमगाट

ठाण्यात रोषणाईचा झगमगाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या अंधकारात हरवून गेलेली दिवाळी यंदा उत्साह आणि आनंदाच्या तेजाने उजळली आहे. खरेदी, फराळ, विविध कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र असताना संपूर्ण ठाणे शहरही आकर्षक रोषणाईच्या झगमगाटाने न्हाऊन गेले आहे. आकाश कंदील, रोषणाईच्या माळांनी ठिकठिकाणी परिसर सजवण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त ठाण्यात दरवर्षी ठिकठिकाणी विद्युत रोषणाई केली जाते. या वर्षीही स्थानक परिसर, राममारुती रोड, कोपरीपासून ते घोडबंदरपर्यंत सर्वत्र आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मोठमोठे आकाश कंदील, तर कुठे आकाश कंदिलांच्या माळाही सजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळत आहे.