ग्रामीण भागातील बाजारपेठ गजबजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातील बाजारपेठ गजबजली
ग्रामीण भागातील बाजारपेठ गजबजली

ग्रामीण भागातील बाजारपेठ गजबजली

sakal_logo
By

कासा, ता. २३ (बातमीदार) : दिवाळी सण सुरू झाला असून कासा बाजारपेठ गजबजली आहे. पावसामुळे अनेक महिने शुकशुकाट असलेली बाजारपेठ गर्दीने फुलली आहे.
कासा चारोटी परिसरातील जवळपास २५ ते ३० गावांतील नागरिक जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी या बाजारात येत आहेत. येथे तेल, धान्य, डाळी, कपडे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, रंग, उटणे व खास करून फटाके खरेदी केली जात आहे. दिवाळी हा सण आमच्यासाठी मोठा आहे. आर्थिक तंगी असली तरी आम्ही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत, असे सुजय पाटील या ग्रामस्थाने सांगितले.