दिवाळीनिमित्त अर्नाळा येथे स्वच्छतेचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनिमित्त अर्नाळा येथे स्वच्छतेचा संदेश
दिवाळीनिमित्त अर्नाळा येथे स्वच्छतेचा संदेश

दिवाळीनिमित्त अर्नाळा येथे स्वच्छतेचा संदेश

sakal_logo
By

वसई, ता. २३ (बातमीदार) : दिवाळीचा आनंद आणि आपले गाव स्वच्छ, निटनेटके असावे असा निर्धार करत ‘मी जागृत बंदर पाडेकर’ अभियानात तरुणांसह चिमुकले स्वच्छतेसाठी सरसावले. या स्वच्छता उपक्रमाचे आयोजन भावेश म्हात्रे यांनी केले. यावेळी अर्नाळा येथील विठ्ठल मंदिर परिसर, जंजिरे अर्नाळाकडे जाणारा मुख्य मार्ग, तसेच गावातील छत्रपती शिवाजी चौकाची स्वच्छता करण्यात आली.
दिवाळीचे औचित्य साधत गावात अहोरात्र सेवा देणाऱ्या अर्नाळा ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना फराळ, तसेच भेटवस्तू देऊन सामाजिक सलोखा जपण्यात आला. यावेळी दर्यासारंग सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र नथू म्हात्रे, तसेच उपाध्यक्ष भास्कर दामोदर मेहेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी ध्रुव नीजाई, देवानंद म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.