खासगी बसची तपासणी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बसची तपासणी सुरू
खासगी बसची तपासणी सुरू

खासगी बसची तपासणी सुरू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : सणासुदीच्या काळात रेल्वे, एसटी बसचे आरक्षण फूल असल्याने खासगी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारत आहेत. अतिरिक्त प्रवासी वाहतूक करून मोटार वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन करत आहेत. परिणामी, गंभीर अपघातांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी अशा खासगी बस वाहतूकदारांची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना परिवहन विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील खासगी बस स्थानक, बुकिंग सेंटरमध्ये जाऊन मोटार वाहन निरीक्षकांची कारवाई सुरू आहे.
यादरम्यान जादा भाडे घेणे, अग्निरोधक नसणे किंवा कालबाह्य अग्निरोधक आणि अवैध मालवाहतूक करत असल्याचे आढळून येत असून त्यावर कारवाई केली जात आहे. ज्यामध्ये ५०० ते १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारत आहेत. शिवाय, मोटार वाहन कायद्यातील तरतुदींप्रमाणे प्रकरण दाखल केले जात असल्याचे आरटीओ अधिकारी सांगत आहेत. क्रॉफर्ड मार्केट, दादर, सायन, चेंबूर, मानखुर्द, बोरिवली, अंधेरी, वांद्रे या ठिकाणांवरील पिकअप पॉइंटवर आणि तिकीट बुकिंग कार्यालयांवर आरटीओ विभागाच्या पथकांकडून पूर्णवेळ तपासणी आणि कारवाई सुरू असल्याचे परिवहन विभागाने सांगितले.