नवी मुंबईत दोन जणांची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत दोन जणांची आत्महत्या
नवी मुंबईत दोन जणांची आत्महत्या

नवी मुंबईत दोन जणांची आत्महत्या

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : ऐन दिवाळीमध्ये रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत रबाळे आणि ऐरोली भागात राहणाऱ्या दोन व्यक्तींनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी दुपारी ऐरोली सेक्टर-१० ए मध्ये घडलेल्या पहिल्या घटनेत बाबू रमा मरांडी (वय ३५) या व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबू मरांडी हा ऐरोली येथे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामाला होता, येथेच तो राहत होता. शुक्रवारी त्याने तेथील बांधकाम साईटवरील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कामगारांनी पोलिसांना दिली; तर शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रबाळे येथील सिद्धार्थ नगर भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत नीलेश रामचंद्र हेपडे (वय ३२) या व्यक्तीने लक्ष्मण निवास या इमारतीजवळ असलेल्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत बुडालेल्या नीलेश हेपडे याला बाहेर काढून त्याला रुग्णालयात दाखल केले. या दोन्ही आत्महत्येच्या घटनांची रबाळे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून दोन्ही आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.