धारावीतील ज्येष्ठांसोबत दीपोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीतील ज्येष्ठांसोबत दीपोत्सव
धारावीतील ज्येष्ठांसोबत दीपोत्सव

धारावीतील ज्येष्ठांसोबत दीपोत्सव

sakal_logo
By

धारावी, ता. २३ (बातमीदार) : धारावीतील ज्येष्ठांसोबत दीपोत्सव आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त धारावीतील ७५ ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून धारावी ज्‍येष्ठ नागरिक संघाची स्थापना १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. त्या संघासोबत अल्झायमर आणि संबंधित विकार सोसायटी ऑफ इंडिया (एआरडीएसआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांना दिवाळीचा आनंद द्विगुणीत करता यावा तसेच त्यांचे जीवन सुरक्षित व आनंदमय व्हावे या हेतूने श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल या ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता डॉक्टर विद्या सेनाय इंटिग्रेटिव्ह थेरपिस्ट व डेमिसिया स्पेशलिस्ट तसेच समाजसेवक राजेश खंदारे, पुष्पा गुलाब कांबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर व कवी जयराम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.