विमानतळावर पार्किंगसाठी अधिक शुल्क आकारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळावर पार्किंगसाठी अधिक शुल्क आकारणी
विमानतळावर पार्किंगसाठी अधिक शुल्क आकारणी

विमानतळावर पार्किंगसाठी अधिक शुल्क आकारणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंगसाठी अधिक शुल्क आकारले जात असल्याचे विमान प्रवाशांनी लक्षात आणून दिल्यावर यासंदर्भात वॉचडॉग फाऊंडेशनने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. ऑपरेशन मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅग्रिमेंटनुसार विमान प्रवाशांकडून पार्किंगचे शुल्क आकारण्याची मागणी वॉचडॉग फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे.
विमातळावर प्रवाशांकडून नियमापेक्षा जास्त पार्किंग शुल्क आकारले जात असल्याचे काही विमान प्रवाशांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे संचालित विमानतळ ३० मिनिटांसाठी २० रुपये पार्किंग शुल्क आकारत आहेत. मात्र मुंबई विमानतळ सामान्य पार्किंगसाठी १४० आणि प्रीमियम पार्किंगसाठी २३० रुपये विमान प्रवाशांकडून आकारत आहे. ऑपरेशन मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅग्रिमेंट (ओएमडीए) अशा पार्किंग शुल्कास परवानगी देत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंगच्या शुल्कासंदर्भात आम्ही नागरी विमानवाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. आमची मागणी आहे की, मुंबई विमानतळाने ओएमडीए करारानुसार विमान प्रवाशांकडून पार्किंग शुल्क आकरावे.
- अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाऊंडेशन