वांद्रे-वरळी सी लिंकवर आलिशान कारला अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांद्रे-वरळी सी लिंकवर आलिशान कारला अपघात
वांद्रे-वरळी सी लिंकवर आलिशान कारला अपघात

वांद्रे-वरळी सी लिंकवर आलिशान कारला अपघात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : वांद्रे-वरळी सी लिंकवर आणखी एका अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवारी (ता. २२) रात्री आलिशान फेरारी गाडीचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर धडकली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. एका उद्योगपतीच्या मालकीची ही गाडी असल्याची माहिती मिळत आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवर ५ ऑक्टोबर रोजी पहाटे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या मार्गावर २० दिवसांत दुसरा अपघात घडला आहे. शनिवारी रात्री वांद्र्याहून वरळीच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या फेरारी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले; मात्र कारमधील एअरबॅग वेळेवर कार्यान्वित झाल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. अन्य चालकांनी अपघातग्रस्त कारमधील चालकाला बाहेर काढण्यास मदत केली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कार टो करून मार्गावरून हटवण्यात आली. कारचालकाने अपघाताची तक्रार वांद्रे पोलिस ठाण्यात केल्याची पोलिसांनी माहिती दिली.