सांडपाण्याच्या समस्येवर लवकरच तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांडपाण्याच्या समस्येवर लवकरच तोडगा
सांडपाण्याच्या समस्येवर लवकरच तोडगा

सांडपाण्याच्या समस्येवर लवकरच तोडगा

sakal_logo
By

खारघर, ता. २४ (बातमीदार) : मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातील बिघाडामुळे रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे खारघरमधील रहिवाशांनी याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत सिडको अधिकाऱ्यांनी बुधवारी खारघर सेक्टर पंधरामधील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी बंद असलेले पंप त्वरित सुरू करून वाहिन्यांच्या स्वच्छतेचे निर्देश स्थानिक कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
खारघर सेक्टर पंधरामध्ये वसाहतीलगत सिडकोने उभारलेल्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे खारघर सेक्टर पंधरा ते सतरामधील परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा या मलनिस्सारण केंद्रातील बिघाडामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे हे केंद्र स्थलांतर करण्यात यावे, असे पत्र सेक्टर पंधरामधील बालाजी रेसिडेन्सी, स्पॅगेटी हौसिंग आणि प्रियदर्शनी सोसायटी, तर सेक्टर पंधरा-सोळामधील पारिजात केचएच दोन सहकारी सोसायटी, सेक्टर सोळा आणि सतरामधील संस्कृती सहकारी आणि खारघर सेलिब्रेशन गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबतची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सिडकोचे अधीक्षक अभियंता दीपक हरताळकर यांनी या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी हरताळकर यांनी केंद्रातील बंद असलेले पंप सुरू करावे, तसेच मलनिस्सारण वाहिन्यांची स्वच्छता करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली आहे.

कोट
सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी केंद्रात बंद असलेले पंप, तसेच रस्त्यावर वाहणारे सांडपाणी निदर्शनास आणून दिले आहे.
- गणेश बनकर, अध्यक्ष, मनसे, खारघर