कांदिवलीत फटाकेमुक्त दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत फटाकेमुक्त दिवाळी
कांदिवलीत फटाकेमुक्त दिवाळी

कांदिवलीत फटाकेमुक्त दिवाळी

sakal_logo
By

कांदिवलीत फटाकेमुक्त दिवाळी
मालाड, ता. २४ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील भाब्रेकर नगर येथील आदर्श बुद्ध विहार येथे यश क्लासेस बालमित्र वर्गाच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी सोहळा आयोजित केला होता. या वेळी प्रेरणा प्रतिष्ठान, आदर्श फाऊंडेशन, सफल विकास वेल्फेअर सोसायटी यांच्या माध्यमातून चित्रकला, दिवे रंगवणे, वक्तृत्व अशा स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. तसेच मधुमेहता फाऊंडेशन यांच्या लार्जेस्ट दिवाळी पार्टी यांच्या माध्यमातून मुलांना शालेय, घरगुती साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अमित गवळी, वैशाली महाडिक, नितीन बाचरे, सुभाष मसळकर, प्रमोद नाचणेकर आदी मान्‍यवर उपस्थित होते.