रोज १००८ दिव्‍यांचा दीपोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोज १००८ दिव्‍यांचा दीपोत्सव
रोज १००८ दिव्‍यांचा दीपोत्सव

रोज १००८ दिव्‍यांचा दीपोत्सव

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः दोन वर्षांनंतर यंदा दीपोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. घरोघरी दिवे, कंदील, फराळ आणि रांगोळ्यांनी यंदाची दिवाळी नागरिकांसाठी विशेष आहे. घाटकोपरमध्ये २५ वर्षांपासून सर्वांत मोठा व जुना दीपोत्सव सुरू आहे. दरवर्षी दिवाळीत रोज १००८ दिवे लावले जातात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, स्त्री-पुरुष सर्वच यात सहभागी होतात. या वर्षी हजारो दिव्यांच्या प्रकाशात आणि मोठी रांगोळी काढून दीपोत्सव साजरा केला जात आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, बरेच नवीन लोक आणि मुले सामील होत आहेत.
आनंद कोठावदे यांनी हा उपक्रम उत्सव म्हणून साजरा करण्याचे काम हाती घेतले आहे. रवींद्र कोठावदे २५ वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा संकल्प घेऊन याची सुरुवात करण्यात आली होती. हा सण साजरा करण्यासाठी मीनाबेन यांचे दिवा लावण्यासाठी आणि रांगोळी काढण्यासाठी कीर्ती धनावडे यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.