कामगार कायदे केंद्राने पायदळी तुडविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार कायदे केंद्राने पायदळी तुडविले
कामगार कायदे केंद्राने पायदळी तुडविले

कामगार कायदे केंद्राने पायदळी तुडविले

sakal_logo
By

उलवा, ता. २४ ः देशातील कामगार संघटनांनी लढून मिळविलेले अनेक हक्क आज कामगारांना गमवावे लागले आहेत. मोदी सरकारने नवनवीन कायदे आणून कामगारांचे कंबरडे मोडले आहे. कामगारांना देशोधडीला लावणारे हे कायदे असून, अनेक कंपन्या कामगारांना किमान वेतनही देत नाहीत, हे चुकीचे आहे. कामगारांच्या न्याय हक्कांसाठी माझी लढाई सुरूच आहे, असे मत कामगार नेते महेंद्र घरत यांनी शेलघर येथे सोमवारी (ता.२४) व्यक्त केले.
न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार हित लक्षात घेऊनच करार केले जातात, कारखाना टिकलाच पाहिजे, पण कामगारही उपाशी राहता कामा नये, अशी माझी प्रामाणिक भूमिका असून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामगार संघटना चालवीत आहे. म्हणूनच आमची संघटना १६१ कंपन्यांमध्ये भक्कमपणे काम करीत आहे, असेही ते म्हणाले. न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे सुमारे १३ हजार कामगार सभासद आहेत, तर यंदा नऊ कंपन्यांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पी. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील, किरीट पाटील आदी उपस्थित होते.

२०२२ चे टॉप फाईव्ह पगार वाढीचे करार
१) हायकल- १६,२००- पाच वर्षांसाठी
२) रायटर बिझनेस- ११,००० - तीन वर्षांसाठी
३) टाईम माऊझर- ९,२५० - चार वर्षांसाठी
४) लॅबगार्ड- ९,००० - तीन वर्षांसाठी
५) केलॉग्स इंडिया - ९,००० - तीन वर्षांसाठी