गुरवपाडा शाळेला लायन्स क्लबकडून दिवाळी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरवपाडा शाळेला लायन्स क्लबकडून दिवाळी भेट
गुरवपाडा शाळेला लायन्स क्लबकडून दिवाळी भेट

गुरवपाडा शाळेला लायन्स क्लबकडून दिवाळी भेट

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) : जिल्हा परिषद शाळा गुरवपाडा शाळेत लायन्स क्लब ऑफ मुलुंड नॉर्थ स्टार मुंबई यांच्याकडून दिवाळीनिमित्त दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यासोबत शालोपयोगी वस्तूही मुलांना देण्यात आल्या. तसेच शाळेसाठी एक कपाट व टेबलही भेटस्वरूपात क्लबकडून देण्यात आले.
उपस्थित लायन्स क्लबचे अध्यक्ष नीलेश फुटाणे, सेक्रेटरी- यशवंत सुर्वे व मेंबर्स यांच्याकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत व आभार शिक्षक केशव भोये यांनी मानले. दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमात शिक्षक दशरथ धुमाळ, विद्यार्थी, पालक, लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.