उपसरपंच निवडणुकीमळे सदस्यांची दिवाळी अज्ञातस्थळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंच निवडणुकीमळे सदस्यांची दिवाळी अज्ञातस्थळी
उपसरपंच निवडणुकीमळे सदस्यांची दिवाळी अज्ञातस्थळी

उपसरपंच निवडणुकीमळे सदस्यांची दिवाळी अज्ञातस्थळी

sakal_logo
By

खर्डी, ता. २४ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा निकाल १७ ऑक्टोबर रोजी लागला. त्याच अनुषंगाने गुरुवारी (ता. २७) उपसरपंचपदाची निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे सरपंचपद आलेल्या पॅनेल प्रमुखांची उपसरपंचपद आपल्याकडे राखण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ऐन दिवाळीत उपसरपंचपदाची निवडणूक लागल्याने व निवडून आलेल्या सदस्यांना सर्वच पॅनेल प्रमुखांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहेत. त्यामुळे सदस्यांची दिवाळी घराबाहेरच होणार असल्याने सदस्य नाराज आहेत.
तालुक्यातील मोखावणे-कसारा, खर्डी, वरस्कोळ, टेंभा, दहिगाव ग्रामपंचायतीच्या काही पॅनेलच्या सदस्यांची संख्या कमी-जास्त झाल्याने सरपंचपद असूनही उपसरपंचपदाची निवडणूक लढताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांचा भाव वधारला आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्ष चिन्हावर लढवली जात नसल्याने निवडून आलेल्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. पॅनेलकडून निवडून आलेला सदस्य कोणालाही मत देऊ शकत असल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.