सणासुदीला राजकारण्यांचे ब्रॅडिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीला राजकारण्यांचे ब्रॅडिंग
सणासुदीला राजकारण्यांचे ब्रॅडिंग

सणासुदीला राजकारण्यांचे ब्रॅडिंग

sakal_logo
By

वाशी, ता. २४ (बातमीदार) ः आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी सणाचे औचित्य साधत इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून दिवाळी पहाट, दीपोत्सव, पणती-उटणे वाटप, किल्ले दर्शन, रांगोळी यांसारख्या स्पर्धांमधून मतदारांना खेचण्याची चढाओढ सुरू आहे.
कोरोनाचे सावट ओसरल्यावर यंदा राज्यात विविध सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गणेशोत्सवानंतर आलेल्या दिवाळीमुळे हा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे. अशातच या सणांच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी मेजवानीसोबत मनोरंजनाचे बेत आखले जात आहेत. नवी मुंबई महापालिकेची लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही महापालिका निवडणुकांनिमित्त यंदाच्या दिवाळीत राजकारण्यांनी विविध माध्यमातून स्वतःचे ब्रॅडिंग करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दिवाळीच्या अनुषंगाने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी पणती, उटणे वाटपापासून दिवाळीच्या अनुषंगाने मनोरंजनपर कार्यक्रमांसोबतच विविध स्पर्धा भरवल्या जात आहेत. तसेच मतदारांबरोबरच कार्यकर्त्यांनाही खूष करण्यासाठी स्नेहभोजनासोबत विविध भेटवस्तू देण्यात चढाओढ लागली आहे.
------------------------------------------
इच्छुकांचे बॅनरबाजीतून शक्तिप्रदर्शन
शिवसेनेतील फुटीमुळे राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात इच्छुक उमेदवारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे. त्याची जय्यत तयारी केली जात असून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून इच्छुक उमेदवारांनी रिंगणात असल्याचे दाखवून दिले आहे.
-----------------------------------------------
सर्वच राजकीय पक्ष आघाडीवर
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळपास अडीच वर्षे लांबणीवर पडल्या आहेत. अडीच वर्षात जवळपास चार वेळा निवडणुका लागणार असल्याचे दिसून आल्यामुळे उमेदवारांनी खर्च केला आहे. आता पुन्हा शिंदे सरकार स्थिर होऊ लागल्यामुळे जानेवारी-फेुब्रवारीमध्ये निवडणुका लागणार असल्याचे दिसून येत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे.