मैदानाची दयनीय अवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानाची दयनीय अवस्था
मैदानाची दयनीय अवस्था

मैदानाची दयनीय अवस्था

sakal_logo
By

कांदिवली, ता. २७ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील महावीर नगरमधील कपोल विद्यालयासमोरील मैदानाची दयनीय अवस्था झाली आहे. डागडुजी, तटभिंत दुरुस्ती आणि बसण्याची आसने या करीता निधी मंजूर होऊनही नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. दरम्‍यान, मैदानाच्‍या दुरवस्‍थेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कांदिवली पश्चिम येथील न. भू. क्र. ९४/ एफ १००, १०१, १०७, १११ आणि ११२ ही जागा खेळाच्‍या मैदानासाठी आरक्षित आहे. मात्र मैदानाच्या काही भागात बांधकाम करण्यात आले आहे. तसेच लाँग टेनिस व इतर खेळाचे विशिष्ट मैदान तयार करण्यात आले आहे. मात्र प्रवेशद्वाराच्‍या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. बाजूला असलेली भिंत पूर्णतः ढासळली आहे. मैदानात बसण्याची आसन व्यवस्था नाही. याकडे नगरसेवक आणि पालिका अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्‍याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बसण्याची आसने अचानक गायब झाली आहेत. प्रवेशद्वाराच्‍या मार्गात दगडगोटे आहेत. बाजूची भिंत ढासळली आहे. लाखो रुपये खर्च करून बनवलेल्‍या मैदानाची पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने दयनीय अवस्था झाली आहे.
- प्रमोद घाग, सामाजिक कार्यकर्ते