ठक्कर बाप्पा परिसरात अस्‍वच्‍छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठक्कर बाप्पा परिसरात अस्‍वच्‍छता
ठक्कर बाप्पा परिसरात अस्‍वच्‍छता

ठक्कर बाप्पा परिसरात अस्‍वच्‍छता

sakal_logo
By

चेंबूर, ता. २५ (बातमीदार) ः पालिकेतर्फे ठक्कर बाप्पा परिसरात स्वच्छता केली जाते. मात्र लक्ष्मीपूजनानिमित्त या परिसरात काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गावर खोबरे, लाडू, जेवण ठेवले होते. यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले. या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी स्‍‍थानिकांनी केली आहे.
‘स्वच्छ भारत... स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका सतत नागरिकांना आवाहन करीत असते. एम पश्चिम अंतर्गत ठक्कर बाप्पा परिसर येतो. या परिसरात काही नागरिक अमावस्या, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच नैवद्य, लाडू, खीर, केळीची पाने, पत्रावळ्या घेऊन रस्त्यावर, पिंपळाच्या झाडाजवळ पूजा करत नारळ व नैवेद्य ठेवून देतात. त्यामुळे शेल कॉलनी व जेतवन उद्यानपर्यंत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. त्‍यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.