मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची दिवाळी अंक योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची दिवाळी अंक योजना
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची दिवाळी अंक योजना

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची दिवाळी अंक योजना

sakal_logo
By

शिवडी, ता. २४ (बातमीदार) ः शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नायगाव शाखेत दिवाळी अंक वाटप करण्यात आले. रविवारी (ता. २३) शाखेच्या कार्यकारिणी व कर्मचारी वर्गाच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. शाखा सदस्य आणि संस्थेचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कोषाध्यक्ष जयवंत गोलतकर व कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र करंबे, शाखा कार्यवाह अमेय कोंडविलकर यांच्या हस्ते दिवाळी अंक वाटण्यात आले. या दिवाळी अंक योजनेत ७९ दिवाळी अंक असून वाचक सभासद ६४ आहेत. ही योजना ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे वाचक सभासद व अंकांमध्‍ये वाढ होणार आहे, अशी माहिती शाखेचे कार्यवाह अमेय कोंडविलकर यांनी दिली.