धारावीत पोलिस, नागरिक स्नेह-मिलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत पोलिस, नागरिक स्नेह-मिलन
धारावीत पोलिस, नागरिक स्नेह-मिलन

धारावीत पोलिस, नागरिक स्नेह-मिलन

sakal_logo
By

धारावी, ता. २४ (बातमीदार) : धारावी पोलिस ठाणेतर्फे धारावीतील प्रतिष्ठित नागरिक, मोहल्ला कमिटी प्रतिनिधी, पोलिस मित्र यांच्यासाठी शनिवारी (ता. २२) ‘स्नेह-मिलन आणि संगीत रजनी’ कार्यक्रमाचे आयोजन धारावी कुंभारवाडा येथील प्रजापती सभागृहात करण्यात आले होते. या वेळी धारावीतील संतोष लिंबोरे यांच्या सुप्रसिद्ध ‘स्वरिता आर्ट’चा संगीत रजनी कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी गेल्‍या काही दिवसांपासून धारावी पोलिस ठाण्याचे हवालदार वैभव शिंदे व त्यांचे सहकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न करत होते. यावेळी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी भक्तिगीते व अन्य गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.