गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागृहात उंदारांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागृहात उंदारांचा सुळसुळाट
गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागृहात उंदारांचा सुळसुळाट

गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागृहात उंदारांचा सुळसुळाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २४ : ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये नाटक बघण्यासाठी बसलेल्या प्रेक्षकांना उंदीर चावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रेक्षागृहात सध्या उंदारांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून आले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी उद्‌घाटन केलेले आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न असलेले गडकरी रंगायतन हे आज बिकट परिस्थितीत असल्याचे दृश्य समोर येत आहे. या प्रेक्षागृहाची नीट देखभाल न केल्यामुळे येथे उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. यामुळे प्रेक्षागृहामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना या उंदरांमुळे त्रास सहन करवा लागत आहे. प्रेक्षागृहात नाटक बघायला आलेल्या प्रेक्षकांच्या पायांना उंदराने चावा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे नाटक पाहण्यास आलेल्या दोन व्यक्तींच्या पायाला उंदरांनी चावा घेतल्याने जखम झाली असून या घटनेबाबत कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्याला विचारले असता उद्धटपणे वागणूक देत त्यांना उडवाउडवीची उत्तर मिळाली.
उलट या अधिकाऱ्याने दुखापत झालेल्या व्यक्तींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास सांगितले. गडकरी प्रेक्षागृहाच्या मंचावर उंदीर असल्याची धक्कादायक बाब असून येणाऱ्या मान्यवरांनादेखील याबाबतीत त्रास होण्याची शक्यता आहे. असे असले तरीदेखील त्या बाबीकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचेच दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात मान्यवरांना जर दुखापत झाली तर गडकरी रंगायतन प्रशासन कशाप्रकारे या संपूर्ण बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे आहे; मात्र अजूनही गडकरी रंगायतन प्रशासन याबाबतीत कोणतीही ठोस कारवाई करण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाला विचारले असता, त्यांनी मौन बाळगले असून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.